Samudramanthan Karata Ghadale | समुद्रमंथन करता घडले
समुद्र मंथन करता घडले अखेर अमृतपान
अविरत अपुल्या परिश्रमातुन होईल राष्ट्रोद्धार
निज स्वताला गाडून घेता वृक्ष डौलदार
दोषा मधल्या तपाराधने फुलपाखरू सुंदर
साधनेतया सतत अंतरी भारतभूचे ध्यान
मातृभूमीच्या सुरेखरुपा सुरात आळवावे
संस्कारांनी सुपुत्र घडवुनी तिजला सजवावे
सत्कर्मांच्या अभिषेकांनी घडवू अमृतस्नान
सहनाववतु मंत्र एकीचा हृदयातुनी गत
नव उन्मेष शालिनी प्रतिमा सर्व दूर प्रकटता
नित्यनूतना हिंदू संस्कृतीत संचरेल नव प्राण
—
Anonymous | Aug 11 2015 – 05:23