Aavghe Garje Pandharpur, Chalal Namacha Gajat || अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||
टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ ||
इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || २ ||
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ३ ||