Veer marathya | वीर मराठ्या | RSS Geet

Please correct the First word of 5th Line – उरणा
It should be – हुरडा

Hurda (हुरडा) is tender form of Jowar before ripening.

बाजीराव पेशव्यांनी अवघ्या २० वर्षांच्या कालावधीत ३५ महत्त्वाच्या लढाया केल्या आणि सगळ्या जिंकून ते अजिंक्य राहिले. ते बहुतांशी घोड्यावरच स्वार असायचे. अनेकदा युद्धाच्या धामधुमीत जेवण करणं शक्य नसायचं. अशा वेळी शेतातला हुरडा घोड्यावरूनच जाता जाता उपटून खायचे. त्यावरून हे वाक्य तयार झाले असावे.

अजून एका पद्यात (आम्ही गड्या डोंगरचे राहणार) ‘बाजीराव तो वीरच मोठा, कणसं खाऊन लढला पठ्ठा’ असा उल्लेख आहे.

धन्यवाद!

वीर मराठ्या ऊठ रे, मर्द मराठ्या ऊठ रे
खड्ग कटीचे झणी उपसुनी दे घोड्याला टाच रे ॥ध्रु॥
मित्र मानिले आम्ही शेजारी, रक्तपिपासू ठरले वैरी
वेळिच त्यांना खडे चारण्या उत्तरसीमा गाठ रे ॥१॥
उरणा चोळित लढला बाजी, मृत्युंजय संताजी धनाजी
तळहाती शिर लढे शिवाजी सह्यगिरीचा वाघ रे ॥२॥
छात्रवृत्तिची मशाल उजळा, रिपुदल कावा नीट न्यहाळा
खिंडित शत्रू पुन्हा गाठुनी घ्या बाजीचे नाव रे ॥३॥

Leave a Reply